अ.क्र. |
सेवांची नांवे |
कृषी विभाग |
1 |
ई-यांत्रिकीकरण :- या सेवेअंतर्गत कोणत्याही शेतकऱ्यांनी शासकीय योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी कृषी संयंत्रणाची मागणी केल्यास ती सेवा अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येईल. |
2 |
ई-ठिबक :- या सेवेंअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना ठिबइ संयंत्र बसवावयाचे असेल त्यांना सेवा अधिनियम अंतर्गत ती सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल. |
3 |
ई-मृद चाचणी :- या सेवेअंतर्गत मृद चाचणी करावयाची असल्यास शेतकऱ्यांना ही सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल. |
4 |
ई-फलोत्पादन :- या सेवेअंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत असलेल्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्याकरीता सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल. |
5 |
ई-कृषी सल्ला :- या सेवेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर कृषी संबंधि सल्ला मोफत उपलब्ध करुन देण्यात येईल. |
6 |
ई-क्रॉप सॅप :- या सेवेअंतर्गत संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमीनीचे सर्वेक्षण करुन पीक संरक्षणासाठी संभाव्य धोके हाताळण्याकरीता सल्ला देण्यात येईल. |
7 |
ई-निर्यात:- या सेवेअंतर्गत द्राक्षे, भाजीपाला वा आंबा या पिकांकरीता निर्यातीसाठी बागा नोंदणीकृत करण्याची सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल. |
8 |
ई-प्रक्रिया:- या सेवेअंतर्गत कृषी प्रक्रिया उद्योग स्थापित करण्याकरीता शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारुन त्यावर केंद्र व राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत कार्यवाही करण्यात येईल. |
9 |
ई-स्वयंसहायता गट:- या सेवेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वयंसहायता गट नोंदणीकृत करुन घेता येईल. |
10 |
ई-परवाना:- या सेवेअंतर्गत कोणत्याही उद्योजकांना बी-बियाणे, खते व औषधे यांचा वापर किंवा उद्योग स्थापित करण्याकरीता लायसन्स साठी अर्ज करता येईल. |
पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विकास विभाग |
- अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम
- पशुपालकांना टोल फ्री क्रमांकाद्वारे देण्यात येणारी माहिती
- आरे दूध केंद्र चालकाकडून दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीचा भरणा केंद्रचालकांच्या बँक खात्यातून थेट रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या खात्यात जमा करणे. (e-receipt of milk and milk products)
- शासनाच्या विविध योजनांमध्ये वितरणाकरीता तसेच दुग्धजन्य पदार्थांकरीता सहकारी संस्था/संघ यांचेकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दूधाचे देयक संबंधीत संघ व संस्था यांना अदा करणे.
- तारापोरवाला मत्स्यालय ऑन लाईन तिकीटांची सुविधा (On line Tickets for Taraporewala Aquarium)
- मासेमारी बोटींना ऑनलाइन मासेमारी परवाना देणे (Issuance of online fishing license to fishing boat)
|