English
 प्रस्तावना
Chief Minister Rural Development Fellowship-2016

महाराष्ट्रातील दुष्काळामुळे हजारो गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुष्काळ या गंभीर समस्येवर मात करता यावी यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक समाजसेवी व्यक्ती तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने युद्धपातळीवर विविध प्रकारचे कार्य हाती घेतले आहे. राज्याला दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या 'जलयुक्त शिवार' या अभियानाने गेल्या काही वर्षात प्रशासकीय अधिकारी व गावकरी यांमधील प्रभावी भागिदारीद्वारे जलसंधारणाच्या उत्तम पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम आता राज्यात सर्वत्र दिसू लागले आहेत. तरीदेखील या अभियानाची अंमलबजावणी करताना शासनाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे ज्यावर शासनाला विशेष लक्ष केंद्रित करायचे आहे.


ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन


‘ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन’ हि एक नाविन्यपूर्ण संकल्पना आहे, ज्यामध्ये ग्रामीण महाराष्ट्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि सेवा प्रदान करून ग्रामीण भागांना शाश्वत विकासासाठी सक्षम व स्वयंपूर्ण करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख हेतू आहे.


सामाजिक हिताच्या दृष्टीने ‘कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी’ या कायद्याअंतर्गत विविध कॉर्पोरेट्सकडून हाती घेतले जाणारे प्रकल्प व अशा पद्धतीचे शासकीय उपक्रम यांच्या अंमलबजावणीत शासन व कॉर्पोरेट्स यांना एकत्रितपणे काम करता येईल. सध्या अस्तित्वात असणाऱ्या कॉर्पोरेट्सच्या सामाजिक हिताच्या प्रकल्पांना, शासकीय योजना व प्रशासकीय यंत्रणा यांचे साहाय्य लाभेल. त्याचप्रमाणे शासन देखील कॉर्पोरेट्सचे तांत्रिक कौशल्य, कामाच्या सर्वोत्तम पद्धती व अनुभव या सर्व गोष्टींना आपल्या कार्यामध्ये सामाविष्ट करेल.


महाराष्ट्रतील दुष्काळ किंवा अन्य सामाजिक समस्यांनी ग्रासलेल्या १००० गावांचे या कार्यक्रमाअंतर्गत २०१८ पर्यंत 'आदर्श गाव' म्हणून रूपांतर करण्यात येईल व अशा गावांचा आदर्श ठेवून महाराष्ट्रातील अन्य गावांचा देखील विकास करण्यात येईल.